परभणी : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यात रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात परभणी ते औरंगाबाद या रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, परभणी ते औरंगाबाद रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्यास मराठवाड्याच्या विकासात भर पडेल. तसेच मानवतरोड ते साईबाबा यांची जन्मभुमी पाथरी पर्यंतचा रेल्वेमार्ग तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळात मंजूर झाला आहे. परंतू अद्याप बजेट जाहीर झालेले नाही़ या मार्गाचे काम तात्काळ करण्यात यावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर विश्वनाथ थोरे, लक्ष्मण शेरे, पी़बी़माने, कलीमभाई, कैलास वाघ, मदनराव कानडे, एऩव्ही़ सिंगापुरे, खडके, जयतापुरकर, गोरे, भिसे, उफाडे, नितनवरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.