24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीआ.रत्नाकर गुट्टे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

आ.रत्नाकर गुट्टे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : दुधाला व दूध पावडर ला अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड येथे भाजपा, रिपाई व महायुतीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून सदरील आंदोलन शांततेत पार पडले असतानाही पोलिसांनी सूडबुद्धीने आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह भाजप, रिपाई व महायुतीच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल केले ते परत घेण्याची मागणी कार्यकर्त्यकडून होत आहे.

दुधाला भाव नसल्यामुळे दूध व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात असल्याने राज्य सरकारला, दुधाला व दूध पावडरला अनुदान देण्यात यावे व दुधाचा दर वाढविण्यात यावा या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने देऊनही राज्य सरकारने दखल घेतली नव्हती. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जात असताना ही जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटने होय.

त्यामूळे वरिष्ठांनी वेळीच दखल घेऊन आ.डॉ रत्नाकर गुट्टे व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांवरील केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन गंगाखेड तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, शहराध्यक्ष सिद्दिकी, नगरसेवक सत्यपाल साळवे, नगरसेवक राधाकिशन शिंदे, विधानसभा अल्पसंख्यांक अध्यक्ष इक्बाल चाऊस यांनी निवेदन दिले.

पालम : राज्य सरकार दूध उत्पादक शेतक-याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे दुध उत्पादक शेतक‍र्यांच्या प्रश्‍नावर मोठे आंदोलन करण्यातआले. यापूर्वी आदोलन करणार असलयाचे पत्र देण्यात आलेले असतांनाही गुन्हे का दाखल केले, प्रशासनाला विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करावयाचा आहे का असा प्रश्‍न पडला असुन जाणीवपूर्वक केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी केली जात आहे राज्यातील शेतक‍र्यांना खत उपलब्ध होत नाही, बोगस सोयाबीनचे बियाणे विक्रीकरुन शेतक‍र्यावर दुबार पेरणीची वेळ या सरकारमुळेच आली आहे.

शेतक‍-याच्या प्रश्‍नावर १ ऑगस्ट रोजी केलेल्या आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून लोकशाहीहीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे दाखल केलेले तात्काळ गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मित्र मंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे रासपचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे शेख गोस,असतखाँ पठाण,ऊबेदखाँ पठाण, गणेश दुधाटे विनायक पौळ,नवनाथ पौळ,इस्माईल शेख भारत डोणे,तायरखा पठाण चंद्रकांत पोळ, चंद्रकांत गायकवाड आदींनी दिला आहे.

Read More  रुग्णालयातील कोरोनाबाधितांना स्मार्टफोन, टॅबलेटस वापरू द्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या