28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीसंबर-परभणी रस्ता दुरूस्तीची विद्यार्थ्यांसह गावक-यांची मागणी

संबर-परभणी रस्ता दुरूस्तीची विद्यार्थ्यांसह गावक-यांची मागणी

एकमत ऑनलाईन

परभणी : संबर- मटक-हाळा – परभणी, देवठाणा-पिंपळगांव टोंग संबर व सावंगी- संबर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे़ या रस्त्यासह त्यावरील पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे शालेय विद्यार्थ्यांनी निवेदन देवून केली आहे़

उपरोक्त विषयास अनुसरुन मौ. संबर, सावंगी, देवठाणा पिपळगाव (टोंग) येथील रहिवाशांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात वरील सर्व गावापासून परभणी जिल्ह्याला जोडणारा एकमेव रस्ता म्हणजे संबर- परभणी रस्ता असल्याचे म्हटले आहे़ परंतू सदरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. वरील गावामधील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मांगणगाव येथे शाळा आहे. परंतू सदरील रस्त्याच्या दुरावस्थामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे देखील कठीण झालेले आहे.

सदरील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असल्यामूळे वाहनधारकांना वाहन चालवने देखील अवघड झाले आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. तसेच उपरोक्त गावातील रूग्णांना परभणी जिल्हा रुग्णालयात येण्यासाठी देखील त्रास होत आहे. तसेच उपरोक्त गावातील लोकांना परभणी हीच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे गावातील लोकांना जाणे येणे कठीण होत आहे. तसेच जिल्हा परिषदेत शिकविणा-या शिक्षकांना देखील येण्या जाण्यास त्रास होत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन नमुद संबर- परभणी रस्त्याची त्वरीत एक महिन्याच्या आत दुरुस्ती करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संबर, पिंपळगाव टोंग, देवठाणा, सावंगी आदी गावक-यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या