21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeपरभणीसोनपेठ न.प.ला पुर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी

सोनपेठ न.प.ला पुर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : कोरोनाचा विळखा शहरात दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेस पुणर्वेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी जिल्हाधिका-यांना करण्यात आली आहे. सोनपेठ शहरात सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच दोन प्रतिष्ठित नागरीकांचे कोरोनामुळे मृत्यु झाले आहेत. सोनपेठ तालुक्यात तालुका प्रशासन कोरोनाशी लढण्याची प्रयत्नशील आहे.

तहसीलदार ,परीक्षाविधीन तहसीलदार, पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक या अधिका-यांसह कमर्चारी सोनपेठ तालुक्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काम करत आहेत. नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी शहरात कठोर उपाययोजना करुन कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नव्हता . स्वच्छता ,साथरोग प्रतिबंधक उपाययोजना त्या कठोरपणे राबवत होत्या.

सोनपेठ करांच्या दुर्दैवाने ऐन कोरोना काळात त्यांची बदली झाली व त्यांचे पद रिक्त झाले . न.प.चा पदभार तात्पुरता मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांकडे देण्यात आला आहे. पण कोरोना च्या पाश्वर्भूमीवर शहराच्या देखभालीसाठी पुणर्वेळ मुख्याधिकारी यांची आवश्यकता आहे. मुख्याधिकारी नसल्याने शहराची व्यवस्था पुर्णपणे ढासाळली आहे.शहरात दररोज रुग्णांची संख्या नुकतेच शहरातील दोन प्रतिष्ठित नागरीक कोरोनामुळे मरण पावले आहेत.

या पाश्वर्भूमीवर सोनपेठ शहरातील नागरीक व व्यापारी यांच्या आरोग्य तपासण्या करणे,मास्क न लावणा-या नागरीकांना दंड लावणे ,कोरोना रुग्ण निघालेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे ,शहराची स्वच्छता करणे आदी बाबी अनेक दिवसापासून ठप्प आहेत. त्यामुळे सोनपेठ नगर परिषदेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी नेमण्यात यावा किंवा तातडीने हा पदभार सोनपेठ तहसीलदार यांच्या कडे देण्याची मागणी सुधीर बिंदू यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या कडे केली आहे. जिल्हाधिकारी यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे अश्वासन दिले आहे.

वाढत्या वीज बिला विरोधात पंढरपूरकर आक्रमक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या