पूर्णा : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधात बातमी दिल्यामुळे त्यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून त्यांची हत्या करण्यात आली़ त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपी तसेच यामागे कोणाचा हात आहे याची शहानिशा करून कडक कारवाई करावी़.
सदर प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे व फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणी पूर्णा अखिल भारतीय पत्रकार संघटनाच्या वतीने नायब तहसीलदार कोकाटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत भोसले, जगदीश जोगदंड, गजानन हिवरे, अनिस बाबूमिया, दिनेश चौधरी, मुजीब कुरेशी, म़अलीम, विजय बगाटे, मोहन लोखंडे, सुशील दळवी, केदार पाथरकर, अनिल आहिरे, अमृत क-हाळे आदी पत्रकारांच्या स्वाक्ष-या आहेत.