28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीगणेशोत्सवानिमित्त नांदेड-पुणे विशेष रेल्वे सोडण्याची मागणी

गणेशोत्सवानिमित्त नांदेड-पुणे विशेष रेल्वे सोडण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

परभणी : आगामी गणेशोत्सवानिमित्त मराठवाड्यातील चाकरमानी व विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी ३० ऑगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत नांदेड-पुणे दरम्यान दैनंदिन उत्सव विशेष रेल्वे चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सिकंदरबाद येथील महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या महिन्यातील ३१ ऑगस्टपासून गणेश उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहाने साजरा करण्यास सुरूवात होणार आहे. या दरम्यान गणेशोत्सव, गौरी आणि लक्ष्मी पूजनसाठी येथे राहणारे मराठवाड्यातील चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी आदी हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. मात्र आतापासूनच मराठवाड्यातून पुणेकरीता उपलब्ध असलेल्या नांदेड-पुणे आणी नांदेड-पनवेल या दोन्ही रेल्वे गाड्यात आरक्षण टिकीट दिवाळी पर्यंत वेटिंगवर आले आहेत.

खास करून गणेशोत्सव दरम्यान २००च्या वर वेटिंग आहेत. त्यात काही दिवसांत तर तिकीटच उपलब्ध नाही. हे लक्षात घेता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वैयक्तिक लक्ष देत नांदेड-पुणे दरम्यान एक विशेष उत्सव रेल्वे चालविण्यासाठी संबंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत. या सोबत गणेशोत्सव दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता नांदेड-औरंगाबाद दरम्यान दैनंदिन नवीन रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा. Þसुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कालानी, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, विठ्ठल काळे इत्यादीनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या