30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home परभणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या टोळीवर हद्दपारीची कारवाई

नऊ गुन्हे दाखल असलेल्या टोळीवर हद्दपारीची कारवाई

एकमत ऑनलाईन

परभणी: जिल्ह्यातील गंगाखेड व पालम तालुक्यासह शेजारच्या जिल्ह्यातील तालुक्यात दहशत निर्माण करणा-या व ९ गुन्हे दाखल असलेल्या टोळीच्या तिघा जणांना हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिले आहेत. या आदेशानुसार पिंपळदरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे यांना अंबाजोगाई येथे नेऊन सोडले आहे. पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीसह इतर ठिकाणी टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश मुंडे, बालाजी मुंडे हे नागरिकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण करून त्यांची जिवित किंवा व्यक्तीकगत सुरक्षितता धोक्यात आणत होते.

नागरिकांना दुखापत पोहचवणे, महिलांची छेड काढणे, महिला, मुलींवर बलात्कार करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करण. घातक शस्त्रानिशी फिरने, जीवे मारण्याची धकमी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून शस्त्र जवळ बाळगुन दुखापत करणे, घरफोडी, चोरी आदी गुन्हे २३१३ पासून आजपर्यंत टोळीतील सदस्यांमार्फत करण्यात आले होते. या टोळीविरूध्द ९ गुन्हे दाखल असून नवनवीन सद्स्यांना टोळीमध्ये घेऊन गुन्हे करण्याचे कृत्य अव्याहतपणे चालू होते. या टोळीविरूध्द हद्दपार प्रकरणाची सुनावणी चालू असताना देखील टोळीप्रमुख विलास मुंडे आणि टोळी सदस्य मंगेश मुंढे यांनी अदखलपात्र गुन्हे देखील घडवून आणले होते. या सर्व घटनांवरून टोळीप्रमुख व त्याच्या टोळीस कायद्याचा आदर व भिती न राहिल्याने त्यांच्याविरूध्द हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या हद्दपार प्रकरणाची सुनावणी १० नोव्हेंबर रोजी झाली. यात टोळीप्रमुख विलास मुंडे याच्यासह मंगेश व बालाजी मुंडे यांना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम तालुका व त्या लगतच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका व बीड जिल्ह्यातील परळी तालुका व तालुक्याच्या हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिले. पिंपळदरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी या तिघानांही अंबाजोगाई येथे नेऊन सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या निष्पन्न करून त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा गुन्हेगार गुंडांविरूध्द हद्दपार, एमपीडीए, मोक्का कायद्याअंतर्गत कारवाया करून गुन्हेगार टोळ्यांचा व सारईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी म्हटले आहे.

ऊस दरासाठी स्वाभिमानी आक्रमक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या