25.4 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeपरभणीआरक्षण, विकासापासून मराठा समाजास वंचित ठेवले

आरक्षण, विकासापासून मराठा समाजास वंचित ठेवले

एकमत ऑनलाईन

परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणासह विकासाकरिता भाजप व मित्रपक्षांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याउलट महाविकास आघाडीने या समाजास सर्वाथार्ने वंचित ठेवण्याचा वषार्नुवषार्पासून पध्दतशीर प्रयत्न केला आहे. या गोष्टीची जाणीव समाजबांधवांना आहे. त्यामुळेच भाजप व मित्रपक्षास पदवीधर निवडणुकीत मोठे पाठबळ मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि.२५) परभणीत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यक्त केला.

वसमत रस्त्यावरील एमआयडीसीतील व्यंकटेश मंगल कायार्लायत आयोजित केलेल्या पदविधरांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार मोहन फड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, किशोर कोंडगे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, मोहन कुलकर्णी, रामप्रभू मुंडे, विठ्ठलराव रबदडे, अ‍ॅड.व्यंकटराव तांदळे, रामकिशन रौंदळे, अजय गव्हाणे, बाळासाहेब भालेराव, संजय रिझवाणी, मधुकर गव्हाणे, अजय गव्हाणे, राजेश देशपांडे, एन.डी. देशमुख, डॉ.राजेंद्र चौधरी, समीर दुधगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ल चढवला. हे सरकार सर्वाथार्ने अपयशी सरकार असल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. कोणत्याही घटकास मुळीच दिलासा दिला नाही. या सरकारची तीन तिघाडा काम बिघाडा अशी अवस्था झाली आहे. कोण काय करतो, काय बोलतो, काय निर्णय घेतोय याचा मागमुसही लावणे अवघड झाले आहे. परंतु भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम महाआघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. विविध प्रभावी योजना, विकास कामे, शेतकरी हिताच्या निर्णयांना स्थगित बहाल करीत या सरकारने स्वत:चे हसे करून घेतले आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा स्वागतार् निर्णयासही या सरकारने स्थगिती दिली ते केवळ गैरप्रकारांकरिता असा आरोप मुंडे यांनी केला. या सरकारलाच आता स्थगिती देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार सर्वाथार्ने अपयशी आहे. केवळ जातीपातीचा आधार घेतला जात आहे. त्यांचा तो प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही असे मुंडे यांनी यावेळी नमुद केले.

शेतकरी कामगार पक्ष आतापर्यंत क्रांतिकारी विचाराच्या सोबत – माजी.आमदार गणपतरावजी देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या