हदगाव (प्रतिनिधी) : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या हदगांव विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे.
सोमवार तेवीस रोजी बरडशेवाळा येथे दत्त मंदिर सभामंडप व गावातील मुख्य रस्ता कामांचे भूमिपूजन केले. तर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या चार वर्ग खोल्यांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करुन आवश्यक पाणंद रस्ता सह गावातील गरजेनुसार आणखी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आमदार जवळगावकर यांनी उपस्थित गावक-यांना दिले.
यावेळी दत्त मंदिराचे महंत भगवान गिरी महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य के.सी.सुर्यवंशी, सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अनिल पवार, मध्यवर्ती बँकेचे सेवा निवृत्त व्यवस्थापक गणेशराव मस्के , बरडशेवाळा सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर मस्के, पोलिस पाटील दत्तात्रय मस्के, ग्रामसेविका आर.बी.मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिभाते, भगवानराव मस्के, बळवंतराव नाईक, अचितराव टाकळीकर, गणेशराव मस्के, माधवराव दहीभाते, साहेबराव दहिभाते, आनंदराव मस्के, दत्तराव नाईक, अनिल आनेराव करमोडीकर, व्यंकटराव बेंबरकर, सुभाषराव मस्के, भुसावळे, रमेश तिवडकर,यांच्या सह गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.