26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeपरभणीनिम्न दुधना प्रकल्पाच्या चौदा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

निम्न दुधना प्रकल्पाच्या चौदा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

एकमत ऑनलाईन

परभणी : सेलू तालुक्यातील लोअर दुधना सिंचन प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस व वरच्या भागातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. त्यामुळे या जलाशयाचे १४ दरवाजे उघडून दुधना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या जलाशयात सध्या ४२५.४०० मिली मीटर पाणीसाठी उपलब्ध असून धरणाचे काही दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी-अधिक केला जाईल, अशी माहिती प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत जलाशयात एकूण ८३ टक्के पाणीसाठा होता. धरणाच्या वरील भागातून पाण्याची आवक सुरू राहील्यास प्रकल्पात लवकरच १०० टक्के जलसाठा होऊ शकतो. त्यामुळे द्वार परिचालन आराखड्यानुसार प्रकल्पाचे दरवाजे लवकरच उघडावे लागतील अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार सुरूवातीला धरणाचे ३ दरवाजे उघडून दुधना प्रकल्पातून १० हजार क्युसेक्स वेगाने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. तर दुपार पासून लोअर दुधना सिंचन प्रकल्पाच्या चौदा दरवाज्यातून दूधना नदीच्या पात्रात १४ हजार २८० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पाण्यामुळे सेलू तालुक्यातील गोमेवाकडी पूल, मोरेगाव पूल, राजेवाडी पूलावरील वाहतूक बंद होईल अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.

दरम्यान निम्न दुधना प्रकल्पातून नदी पात्रात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे प्रकल्पाच्या खालील नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरू नये. गुरेढोरे, विद्युत साहित्य असल्यास लागलीच काढून घ्यावेअसे आवाहन पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.

गोयल राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या