23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीशासकीय योजनांचे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेतून वाटप करा

शासकीय योजनांचे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेतून वाटप करा

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर व सेलू तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचे अनुदान मध्यवर्ती बँके ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

जिंतूर व सेलू तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्य ह्या शाखा आहेत. शासकीय योजनांचे अनुदान आले असता या बँकेतील दलाल लोक या अनुदान वाटपात सर्रासपणे गैरव्यवहार करीत आहेत. मयत झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदानही परस्पर उचलून शा सनाची फ सवणुक करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात माजी आ.विजय भांबळे यांनी जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे. त्याचबरोबर बँक व्यवस्थापन लाभार्थ्यांचे आलेले अनुदान वाटप करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लावत आहे. यामुळे लाभार्थ्यांचा पैसा वाटप करण्यास विलंब लावल्या जात आहे.

याशिवाय अशा प्रकारच्या अनुदानाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमधुन काढण्यासाठी लाभार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. यासाठी बँकेचे अधिकारी, राजकीय पुढारी जबाबदार आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्व प्रकारच्या शासकीय अनुदानाचे वाटप हे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेतुनच करावे व सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा असे जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या पत्रात माजी आ.विजय भांबळे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या