परभणी : भारतीय खेल प्राधिकरण तथा क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे यांच्या द्वारे सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘परभणी सिटी कल्ब ‘ येथे दि.३जुन रोजी टेबल टेनिस खेळासाठी आवश्यक असणारे गणवेष, ट्रक सुट, शुज, टे.टे.बॅट, वाटपाचा कार्यक्रम पार पडला.एकुण ३२ खेळाडूंना संपूर्ण किटचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड , यांनी खेळाडूंना भविष्यात खेळातुन होणारे फायदे व आरोग्य विषयक माहिती दिली. तर सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी केंद्र शासनाच्या वतीने प्राप्त होणारे सुविधा चा फायदा घ्यावा व सिटी क्लबच्या वतीने विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी लागणारी सुविधा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत, जिल्हाक्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,परभणी उपाध्यक्ष सुभाष जावळे, कोषाध्यक्ष कृष्णा भाले, परभणी जिल्हा टे.टे संघटना सचिव गणेश माळवे कार्यकारी सदस्य विलास कांबळे,शिवकुमार लाठकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, शिवाजी खुणे, नगरसेवक सचिन आंबीलवादे, आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर शहाणे यांनी केले. आभारप्रदर्शन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र चे प्रशिक्षक चेतन मुक्तावार याने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयकुमार तिवारी,धीरज नाईकवाडे, संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले.