27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीजिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के, दहावीतही पिछाडीवर

जिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के, दहावीतही पिछाडीवर

एकमत ऑनलाईन

परभणी : दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागात जिल्हा अखेरच्या म्हणजे पाचव्या स्थानावर राहिला असून जिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के इतका लागला आहे.

जिल्ह्यातील जिल्ह्यातील ३२ हजार ७३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील ३१ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विशेष प्राविण्यासह ७ हजार ४२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ८ हजार ४४७, द्वितीय श्रेणीत ७ हजार १६९ तर उत्तीर्ण श्रेणीत ४ हजार ७६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण २८ हजार ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा हा निकाल ८८.४८ टक्के इतका लागला आहे.

मानवत : येथील श्रीमती शंकुतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.२० टक्के लागला असून विद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण २९२ नियमित विद्यार्थ्यांपैकी २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी तब्बल १०३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पैक्षा जास्त गुण मिळवले असून १०५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून श्रुतिका जयकुमार राठी हिने ९९ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक तर प्रमोद कारभारी रासवे (९८.४०टक्के), रोहिणी सुरेश मेहत्रे (९८.४० टक्के) यांनी द्वितीय व संतोष राऊळ (९८ टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाततर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत ओंकार बोराडे यास ९६.८० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. दहावी बोर्ड परीक्षेत द्वितीय प्राची आकात ९५.२०टक्के, तृतीय आदित्य उफाड ९५ टक्के व महेश तांबे ९५टक्के विशेष प्रावीण्यासह पंकज मानवतकर ९३.८०ज्ञ्, रितेश गिराम ९३.२०ज्ञ्, सलोनी डख ९२.८ तनुश्री सुरवसे ९२.२० टक्के, स्नेहल जाधव ९१.२०टक्के, सोरभ मगर ९०.६० टक्के, संदेश कोटलवार ९०.६०टक्के प्रथम श्रेणीत अभिजित वाघ ८९.४० टक्के, अंजली कावळे ८८टक्के, सुदर्शन मानवतकर ८८टक्के, आदींनी यश संपादन केले.

भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
पाथरी : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबाद च्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत पाथरी येथील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित भारतरत्न खान अब्दुल गफार खान मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी . विद्यालयाचा एकूण निकाल 94.11% लागला आहे . यातून यशाची परंपरा कायम राखली आहे.

दिलीप शेषेराव गालफाडे या विद्यार्थ्यांने 83.40% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे कु निकीता पंडित गालफाडे 79.201 % घेऊन द्वितीय क्रमांक घेतला आहे तृतीय कु. वैष्णवी उध्दवराव पितळे 68. 20 टक्के व करण विजय जाधव 68 . 20 टक्के गुण प्राप्त केले आहेत . यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी संस्थेचे सचिव तथा नगर सेवक तारेख खान दुर्राणी व माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुर्राणी नगर परिषदचे गटनेते जुनेद खान दुर्राणी व शेख साजिद सर , प्राचार्य तथा मुख्याध्यापक गणेश पितळे , शिक्षक वृंद जी. डी. पोपळघट. , सौ. पदमवार , बनकर एस. जी. झाडे बी.एन. प्राध्यापक वराडे , मोरे , संदीप पोपळघट , शेख मलिक , शाकेर , शेख जी.के. , चिद्रावार आर .बी ., शेख ए.एन. , पठाण एन.एम. , पाटील आर.बी. वैद्य , अब्दुल हसीब नामदेव गवारे यांनी कौतुक केले आहे .

साईकृपा माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के
बोरी : बोरी येथील साईकृपा माध्यमिक विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दहावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली. सनातयबा शेख या विद्याथिर्नी ने 97.00% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मयुरी रावसाहेब देशमुख, प्रीती यशवंतराव देशमुख, सुनील बद्रीनाथ खिस्ते, संदीप पांडुरंग ठमके या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनीताई चौधरी तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More  प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 31 जुलै अंतिम मुदत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या