बोरी : परभणी जिल्ह्यातील बोरी येथील सुपुत्र असलेले व डीसीजीआयचे संचालक डॉ.वेणुगोपाल गिरीधारीलाल सोमाणी यांनी कोरोना लसिना परवानगी देऊन परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या निमित्ताने बोरी व परिसरातून डॉक्टर सोमानी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये डॉ़वेणुगोपाल सोमानी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण नांदेड येथील सायन्स कॉलेजमध्ये झाले. त्यांनी एमफ़ार्म आणि नागपूर विद्यापीठातून पीएच़डी़पूर्ण केली आहे. सुरुवातीला त्यांनी ड्रग्स इन्स्पेक्टर म्हणून काम सुरू केले़ यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीत 2019 पर्यंत डीसीजीआय संचालक पदापर्यंतत मजल मारली़ त्यांनी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली अशा ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर यशस्वी कामगिरी केली आहे. डॉ.सोमानी सध्या धोरण तयार करणं, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया, नियामक प्रक्रियेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत.
डॉ. सोमानी यांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना डीसीजीआयकडून परवानगी दिली़ सोबतच कॅडीलाच्या लसीला तिस-या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अॅलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी 110 टक्के सुरक्षित आहेत, असे व्ही. जी सोमाणी यांनी म्हटले आहे.
डॉ़सोमानी यांचे बालपण बोरी गावातच गेले असून ते लहानपणापासूनच अत्यंत खेळाडू वृत्तीचे होते़ लहानपणापासून त्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती़ त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये मॅनेजर पदावर होते. घरात काका गोविंद प्रसाद, गणेश लाल, बहिण रेखा तापडीया असा परिवार आहे. या यशाबद्दल संपूर्ण परिवाराचे परिसरातून कौतुक होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अधिका-यांना अधिक दक्षता घेण्याचे आदेश