26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू; राज्यात पहिलेच परभणी कार्यालय

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू; राज्यात पहिलेच परभणी कार्यालय

एकमत ऑनलाईन

परभणी:- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. ड्रेसकोड लागू करणारे परभणी येथील हे कार्यालय राज्यात पहिलेच असल्याचेही अधिकार्‍यांनी म्हटले आहे. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच हा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेशकुमार कामत यांनी येथील कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्यासह कर्मचार्‍यांचे याबद्दल कौतुक केले.

राज्य सरकारने शासकीय कर्मचार्‍यांनी काय घालू नये, याबाबत निर्देश जारी केले होते. तसेच सर्वच कर्मचार्‍यांनी ड्रेसकोडमध्येच कार्यालयात यावे, असेही म्हटले होते. या आदेशाचे पालन येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केले. नूतन वर्षात सर्वच कर्मचार्‍यांनी एकाच पोशाखात कार्यालयात हजर रहावे, जेणे करून येणार्‍यांना कर्मचारी ओळखू यावा, अशी त्या मागची भूमिका असल्याचेही त्यांनी विशद करीत कर्मचार्‍यांशी चर्चा करून ठरावीक रंगाचा गणवेशातच दररोज कर्मचार्‍यांनी यावे, असे म्हटले. त्यानुसार नूतन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गणवेशात येत असून यामुळे येणार्‍या नागरिकांनाही नेमके कोणाला भेटावे, हा प्रश्न आता पडेनासा झाला आहे.

दरम्यान, नांदेड यथील प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेशकुमार कामत यांनी या नव्या बदला बाबत कर्मचार्‍यांसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांचे कौतुक केले. कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू करणारे परभणीचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रथमच असून यामुळे येथील अधिकारी – कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे. सार्वजनिक आयुष्यात वावरत असताना सरकारी कर्मचार्‍यांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलावा ही भावना सरकारची आहे. कपड्यांवरुन सरकारी कर्मचारी ओळखला जावा आणि प्रत्येक सरकारी कर्मचार्‍याला जबाबदार व्यक्ती समजलं जावं, यासाठी हा बदल केला गेलाय.

ड्रेसकोड लागू करणारे राज्यातील पहिलेच कार्यालय : नकाते
ड्रेसकोडमुळे कर्मचार्‍यांत निश्रि्चतच एकोपा वाढेल, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, येणार्‍यांनाही कर्मचारी लागलीच ओळखू यावेत याबरोबरच कामासही गती यावी, यासाठी हा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात पहिल्यांदा ड्रेसकोड लागू करणारे परभणी एआरटीओ पहिले कार्यालय ठरले आहे.
– श्रीकृष्ण नकाते,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी.

भारताचा जीडीपी ७.७ टक्क्यांनी घसरला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या