21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home परभणी उपासमारीला कंटाळून वाहन चालकाची आत्महत्या ?

उपासमारीला कंटाळून वाहन चालकाची आत्महत्या ?

एकमत ऑनलाईन

सिध्देश्वर गिरी सोनपेठ : मागील पाच महीन्यापासून लावण्यात आलेली संचारबंदीस हटवले जात नाही मुलांच्या शिक्षणासह परिवारावर उपासमारीची वेळ आली.या सर्व प्रश्नाने वैतागुन एका ड्रायवरने विटा(बु.)येथील गोदावरी पात्राच्या पुलावरुन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची खळबळजनक घटना पाथरी तालुक्यातील विटा(बु.)येथे घडली असून यामुळे गावक-यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पाथरी तालुक्यातील विटा(बू.)येथील तुकाराम महादु तुपसमिंदर हा युवक पाथरी-सोनपेठ या मार्गावर दुस-याच्या प्रवाशी गाडीवर चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह चालवायचा मिळणा-या पैशातून तो कुटुंबाचा गाडा ओढत घरप्रपंच चालवत असे मात्र मागील पाच महीन्यापासून कोरोना या आजाराच्या पाश्वर्भूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचाबंदीने हातचा रोजगार गेला. यातच

मुलांची शिक्षण आणि घर कसे चालवावे असा प्रश्न आ वासुन समोर उभा असतांनाच पुन्हा पुन्हा संचारबंदी होऊन उपासमार होण्याची चिन्हे समोर दिसल्याने तुकाराम याने दी.१६ रविवार रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोदावरीवरील पुलावरुन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून संचारबंदीतील प्रश्नाचा पहीला बळी गेल्याची चर्चा होत आहे.दरम्यान तुकाराम याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ,एक बहीन,चार मुले,पत्नी असा परिवार आहे.विभक्त कुटुंब असल्याने वरील सर्व प्रश्नानी त्याच्या मनात घर केले होते.

प्रशासन झोपेचे सोंग घेऊन नाटकी वेशात
या घटनेची माहीती गावातील सामजिक कार्यकर्त्यांनी पाथरीचे तहसीलदार सुभाष कट्टे,सहाय्यक पोलीस निरीक्षक तिप्पलवाड यांच्यासह बिट जमादार गणेश फड यांना दिली होती.मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नव्हता रात्री ११ वाजेपर्यंत तलाठी मिलिंद विटेकर वगळता कोणीही घटनास्थळाकडे फिरकले नव्हते,या घटनेची माहीती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर,जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना देताच त्यांनी तत्काळ याची दखल घेऊन पुढील कायर्वाहीसाठी पावले उचल्याचे कळते.

मात्र पाथरीच्या स्थानिक प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यानेच आणि अवैध व्यवसायांना बळ दिले जात असल्यानेच गुन्हेगारी वाढत असून यातून निर्माण होणा-या व्यसनाधिन्नतेतून आत्महत्या झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यात अवैध वाळू उपशात मिळणा-या पैशातून व्यसनाधिन्नता निर्माण होत असल्याचीही अनेक उदाहरणे गोदाकाठी पहायला मिळतील.

बीड: मराठा समन्वयक समितीकडून राज्यभर आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या