30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीपरभणीतील रस्त्यांवर शुकशुकाट

परभणीतील रस्त्यांवर शुकशुकाट

एकमत ऑनलाईन

परभणी : शासनाने १४ एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर केलेले असताना परभणी शहरासह जिल्ह्यात नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू होता. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी १७ ते २२ एप्रिल पर्यंत संपूर्णत: लॉकडाऊनचे आदेश काढले होते. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी परभणी शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहाया मिळाला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्यासह महसूल व पोलिस अधिक-यांनी सकाळीच रस्त्यावर उतरून लॉकडाऊनची पाहणी केली.

जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दोन दिवसांपुर्वी जिल्ह्यातील रूग्णांनी १ हजारांचा आकडा पार केला होता. तर शुक्रवारी ७०० पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले होते. या पार्श्वभुमीवर रूग्णांची संख्या कमी व्हावी या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी शनिवार पासून अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. या आदेशानंतर शनिवारी पहिल्याच दिवशी बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळाला. लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.

लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे – पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या