22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeपरभणीआयशर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक

आयशर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक

एकमत ऑनलाईन

चारठाणा : जिंतूर ते औरंगाबाद महामार्गावर शुक्रवारी, दि.११ रोजी चारठाण्यापासून एक किलो मीटर अंतरावर आयशर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात आयशरमधील दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमी व्यक्तींवर प्रथमोपचार करून त्यांना उपचारार्थ परभणीकडे रवाना करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

जिंतूर येथून औरंगाबादकडे सिमेंट हॉट मशीन घेवून जाणारा आयशर (एम.एच.२०ई.एल.२१२०) व औरंगाबादहून नांदेडकडे अंडे घेवून जाणारा ट्रक (यू.पी.१४ एच.टी.५२८५) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात आयशरचा समोरचा भाग पूर्णत: दबला गेला. त्यामुळे चालक विजेंद्र राजपूत (वय २२) व सहचालक शुभम सोमनाथ पाखरे (वय २०) हे दोघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच चारठाणा पोलिसांसह तारेख देशमुख, वसीम इनामदार, साबेर पठाण, नामदेव चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदिप आल्लापूरकर, कर्मचारी गरुड, सूर्यवंशी, भानुसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या आयशर मधील दोघा जखमींना बाहेर काढून त्यांना जिंतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिस खान आणि परिचारीका देशमुख यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करीत दोघाही जखमींना उपचारार्थ परभणीकडे रवाना केले.

बड्या कंपन्यांसाठी नवी करव्यवस्था

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या