22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीमहाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधीपदी अब्दुल सत्तार इनामदार यांची निवड

महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधीपदी अब्दुल सत्तार इनामदार यांची निवड

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते तथा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार एम़एम़शेख यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे़ अब्दुल सत्तार इनामदार यांनी विविध पदावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेवून त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

परभणी शहरातील रहिवासी असलेले अब्दुल सत्तार इनामदार काँग्रेसचे जेष्ठ नेते असून त्यांनी आज पर्यंत काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष, काँग्रेस अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष आदी विविध पदावर कार्य केले आहे़ या सर्व पदांवर उल्लेखनीय कामगिरी करीत त्यांनी काँग्रेसचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवले आहेत़ या विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब नागरीकांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे़ तसेच सातत्याने काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले आहेत.

या सर्व कार्याची दखल घेवून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार एम़एम़शेख यांनी केलेल्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अब्दुल सत्तार इनामदार यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधीपदी निवड केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल अब्दुल सत्तार इनामदार यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेशराव वरपूडकर, माजी खा़अ‍ॅड़तुकाराम रेंगे पाटील, जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गफार मास्टर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खदीरला हाश्मी, अल्पसंख्यांक जिल्हा महासचिव तब्बू पटेल, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख मतीन, परभणी तालुका अध्यक्ष खदीर पठाण, महाराष्ट्र ओबीसी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव लटपटे, मराठवाडा अल्पसंख्याक अध्यक्ष अहमद चाऊस आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या