परभणी : केंद्र शासनाने जीएसटीच्या करणीमांमध्ये बदल करून अन्नदानाच्या वस्तूवर जीएसटी लागून मोठी दरवाढ केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली़.
केंद्र सरकारने जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करून नवीन धोरण अंमलात आणले असुन अन्नधान्याच्या वस्तू देखील जीएसटी मधून सुटलेल्या नाहीत़ खाद्यपदार्थाच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणावर जीएसटीची दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनता व गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणावर लूटच होणार असल्याचे नमूद केले आहे़.
नियमात बदल करून अन्नधान्य वस्तूवर जीएसटीच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य व गोरगरिबांना बसणार असून महागाईत होणारी ही वाढ सर्वसामान्यामध्ये तिव्र रोष निर्माण करणारी आहे़ या धोरणा विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा शाखेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अमोल ढाकणे, उत्तरचे जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष टी़डी़रुमाले, जिल्हा महासचिव सर्जेराव पंडित, युवा जिल्हाध्यक्ष सुमित भालेराव, युवा महासचिव तुषार गायकवाड, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, संदीप खाडे, शेख युसुफ शेख कलीम, मिलिंद खंदारे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत़