24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीरहाटीच्या नदीपात्रात दिले आपत्कालीन प्रशिक्षण

रहाटीच्या नदीपात्रात दिले आपत्कालीन प्रशिक्षण

एकमत ऑनलाईन

परभणी : नैसर्गिक आपत्कालीन स्थितीत जिवित हानी कशी टाळावी या हेतूने आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या तज्ञांनी रहाटी येथील नदी पात्रात शनिवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी नगरपालिकांसह अन्य यंत्रणांच्या सहका-याने बोटीतून प्रशिक्षण दिले.

पावसाळ्यातील पूर परिस्थिती सारख्या आपत्तीत जिवीत हानी कशी टाळावी या दृष्टीकोनातून जिल्हा महसूल यंत्रणेंतर्गत आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे संबंधित नगरपालिकांच्या व अन्य सरकारी यंत्रणांच्या अधिकारी – कर्मचा-यांना प्रशिक्षणानिमित्त रहाटी येथील नदीपात्रात बोलावण्यात आले होते.

या ठिकाणी या कक्षाच्या तज्ञांनी पूरस्थितीकिंवा अन्य आपत्कालीन स्थितीत सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताची हानी टाळण्याकरीता काय काय उपाययोजना करता येवू शकते याचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी आत्याधूनिक बोटींचा वापर केला. त्याद्वारे स्थिती कशी हाताळावी, या संदभार्तील महत्वपूर्ण टिप्स दिल्या.

दरम्यान, रहाटीच्या पात्रातील हे प्रशिक्षण सुरु असतांना राहटीच्या पूलावर नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. काहींना हे प्रशिक्षण सुरु आहे हे समजलेच नाही. यापैकी काही उपद्रवींनी तात्काळ व्हिडीओ क्लिप्स काढून सोशल मीडियातून तातडीने मेसेज व्हायरल केले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. परंतु, स्थिती लक्षात आल्यानंतर इतरांनी सुटकेचा नि:श्­वास सोडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या