20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeपरभणीग्रामपंचायतच्या जागेवरच ग्रामपंचायत सदस्याचे अतिक्रमण

ग्रामपंचायतच्या जागेवरच ग्रामपंचायत सदस्याचे अतिक्रमण

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : तालुक्यातील मौजे थडीउक्कडगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरच ग्रामपंचायत सदस्यांनी बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे़ या प्रकरणी अतिक्रमण करणा-यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोनपेठ गटविकास अधिका-यांन दिले आहेत.

सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कडगाव येथील माजी उपसरपंच आत्माराम रणखांबे यांनी दि.१४ ऑक्टोबर २०२१ रोजी ग्रामपंचायतच्या केलेल्या तक्रारीनुसार रोहिदास कोळी व पार्वती रोहीदास कोळी यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर बांधकाम करुन कब्जा करण्यात आले असल्याचे म्हटले होते. यावरून सदरील ठिकाणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली असता ग्रामपंचायतच्या जास्तीची जागा घेतली असल्याबाबत निदर्शनास आले.

तेव्हा अतिक्रमण करणारावर नियमाप्रमाणे कार्यवाही करून व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करणा-याचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या