19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeपरभणीइंग्रजी इतिहासकारांना वाचले पाहिजे : डॉ. आनंद पाटील

इंग्रजी इतिहासकारांना वाचले पाहिजे : डॉ. आनंद पाटील

एकमत ऑनलाईन

परभणी : खरा इतिहास समजून घ्यावयाचा असेल तर इंग्रजी इतिहासकारांना वाचले पाहिजे, असे मत इतिहास अभ्यासक तथा विचारवंत डॉ.आनंद पाटील यांनी व्यक्त केले.

पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्सवर शनिवार पासून मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनास प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन डॉ.पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजयराव घोगरे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मधूकरराव मेहकरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव गोळेगावकर, कंत्राटदार आर.बी. घोडके, माणिकराव केरवाडीकर, जिजाऊ ब्रिगेडच्या कांचनताई कारेगांवकर, तहेसीन अहेमद खान, कवी इंद्रजित भालेराव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, रविंद्र पतंगे, भावना नखाते, डॉ.विद्या चौधरी, डॉ.राजु सुरवसे, डॉ.दिलीप मोरे, लक्ष्मणराव तारे, दादासाहेब टेंगसे, रणजित पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भूसारे यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिवधर्म या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.पाटील म्हणाले, मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासांची अनेक पुरावे आहेत. विशेषत: देशातील आणि विदेशी इतिहास संशोधकांच्या लेखनाची तूलना केली तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. इतिहासातील संशोधनातील बारकावे, विविध शब्दांचे अर्थ, उत्पत्ती कशी झाली याविषयीही विवेचन केले.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष घोगरे यांनी मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वच पक्ष आरक्षणाचे समर्थन करीत आहेत. मात्र, न्यायालयात ते टिकत नाही. त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींच्या मदतीकरीता पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले.

या प्रसंगी खासदार जाधव यांनी मराठा समाजाने एकत्र येवून सर्वांगिण विकास साधला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कवी भालेराव यांनी माँ जिजाऊ यांच्यावरील एकुलती एक लाडाची लेक हे गीत व शिक बाबा शिक लढायला शिक ही कविता सादर केली. कार्याध्यक्ष प्रा.अर्जून तनपूरे यांनी महाअधिवेशनामागील भूमिका विषद केली. स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख यांनी समाजातील विविध प्रश्‍न सुटावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भूसारे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाची भूमिका विषद केली. सुभाष ढगे व उषाताई लोहट यांनी सूत्रसंचालन तर सुधाकरराव गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. या उद्घाटकीय सोहळ्यास सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमराव खेडेकर, माजी आमदार रेखा खेडेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या