20.9 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeपरभणीस्वरमयी दिवाळी पहाटला रसिकांचा उदंड प्रतिसाद

स्वरमयी दिवाळी पहाटला रसिकांचा उदंड प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

परभणी : महापालिका आणि अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. सुरांची ही मैफिल चढत्याक्रमाने जात सलग अडीच तास रंगली.

महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी या कार्यक्रमातून पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्यासह परभणीतील स्थानिक गायक यज्ञेश्वर लिंबेकर, अनिकेत सराफ, नम्रता पाटील, प्रांजल बोधक, राजू काजे, शुभम म्हस्के या कलावंतांना सुध्दा निमंत्रित केले होते. सुरूवात महागायक यज्ञेश्वर लिंबेकर यांनी आपल्या पहाडी कसदार गायकीत राम कृष्ण हरि नामघोषाने केली.

त्यानंतर ज्ञानेश्वर मेश्राम यांनी सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला हा लोकप्रिय सांप्रदायिक अभंग सादर केला. माऊलींनी आणि नम्रता पाटील यांनी गायलेल्या गोमू संगतीनं गाण्यावर रसिकांनी ठेका धरला. अनिकेत सराफ यांनी निघालो घेउन दत्ताची पालखी या भक्तिगीतांतून त्यांच्या तरल गायकीने भक्तिरंग भरला.

शुभम म्हस्के याने तुज्या रूपाचं चांदणं पडलंय हे गीत अतिशय बहारदार शैलीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. प्रांजल बोधकच्या लख्ख पडला प्रकाश या अजय अतुल द्वारा संगीतबध्द गीताने वातावरणात कमालीचे चैतन्य निर्माण झाले. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या लोकप्रिय झेंडा गीताने मैफिलींची सांगता झाली.

सुत्रसंचालन अनिकेत सराफ यांनी केले. येथील चित्रकार सिध्दार्थ नागठाणकर यांनी अतिशय सुंदर पेंटींग काढून पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांना भेट दिले. आमदार सुरेश वरपुडकर, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त गग्गड यांनी सर्व कलावंतांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, उद्यान विभागाचे सुधीर टेहरा, युवराज साबळे, उद्यान परवेक्षक मो. अथर, राहुल धुतडे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा शेख शादाब यांनी परिश्रम घेतले. आभार सुभाष मस्के, अभिजीत कुलकर्णी यांनी मानले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या