25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeपरभणीअ‍ॅ­थलेटीक्स स्पर्धांना उत्स्फुर्त प्रतिसाद

अ‍ॅ­थलेटीक्स स्पर्धांना उत्स्फुर्त प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

मानवत : पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीगणेश रामचंद्र कत्रुवार फार्मसी महाविद्यालय येथे ई.डी.सा.जी-२ झोन नांदेड (मुले)अ‍ॅ­थलेटीक्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, धावणे १००, २०० मीटर व ४०० मीटर रीलेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील सपर्धेत फार्मसी व पॉलिटेक्निकच्या एकूण २० महाविद्यालयाच्या खेळाडूनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार यांच्या हस्ते झाले. तसेच उद्घाटन कार्यक्रमास दमकोडवार शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय, नांदेड (समन्वयक विभागीय ई.डी.सा.झोन नांदेड) व संस्थेचे संदस्य विजयकुमार दलाल, दिलीपराव हिबारे, प्राचार्य डॉ.कदम एन आर. उपस्थिती होते.

सपर्धेसाठी पंच म्हणून परभणी जिल्हा अ‍ॅ­थलेटीक्स असोशिएशन यांच्या टिमचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या