21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeपरभणीप्रत्येकाने आपला गाव बालविवाह मुक्त करावा : जिल्हाधिकारी गोयल

प्रत्येकाने आपला गाव बालविवाह मुक्त करावा : जिल्हाधिकारी गोयल

एकमत ऑनलाईन

परभणी: जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण ५२ टक्के आहे. बाल विवाहाबद्दल गावात चर्चा झाली पाहिजेÞ प्रत्येकाने आपला गाव बालविवाह मुक्त करावा तसेच जे व्यक्ती बाल विवाहाला खतपाणी घालण्याचे काम करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहेÞ

जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, ग्रामविकास विभाग यांच्या वतीने बुधवार, दिÞ०३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन अक्षदा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.

यावेळी बालविवाह निर्मूलनासाठी सजीव देखाव्यांचे सादरीकरण, बाल विवाह निर्मूलन नाटिका, व्हिडीओ फिल्म्स, महिलांचे गावातील बालविवाह निर्मूलन करताना आलेले अनुभव सादर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी, बालविवाह निर्मूलनासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी आपली जबाबदारी ओळखून बाल विवाह थांबवावेत असे आवाहन केलेÞ यावेळी समाजसेवक सूर्यकांत कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी मार्गदर्शन केलेÞ

यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन, न्या.लांडगे, मार्गदर्शक सूर्यकांत कुलकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉÞसंदीप घोन्सिकर, मानवाधिकार राज्य समन्वयक ऍड़सांची मुंगे, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, सीडीपीओ रुपाली रंगारी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष रंिवद्र कातनेश्वरकर, जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे आदींची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या