24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीउत्कृष्ट जिल्हा शिक्षक, आदर्श शाळा, गुणवंत विेद्यार्थांचा गौरव

उत्कृष्ट जिल्हा शिक्षक, आदर्श शाळा, गुणवंत विेद्यार्थांचा गौरव

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि.०९ सप्टेंबर रोजी संपन्न झाला़ यावेळी जिल्ह्यातील ११ शिक्षकांचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्काराने तसेच प्रत्येक तालुक्यातून एका शाळेचा आदर्श शाळा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उदघाटक जिल्हाधिकारी आंचल गोयल, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, तर मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथील साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य वित्त व लेखाधिकारी सचिन कवठे, कवी इंद्रजित भालेराव, हवामान अभ्यासक पंजाब डख, कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी सभापती अनिल नखाते, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणात सर्वात मोठी क्रांती घडवून आणली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट संकल्पना निर्माण कराव्यात़ जेणेकरून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. शिक्षकांनी ज्ञान वृद्धीसाठी परप्रांत भ्रमंती करावी, शिक्षकांनी विद्यार्थ्याना आपुलकीची आणि स्वच्छतेची शिकवण देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी कविता जगण्यात आहे पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. नवोदय प्रवेश पात्र विद्यार्थी, एनएमएमएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, १० वी व १२ वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त, गुणवंत खेळाडू अशा जवळपास ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, डॉ. रामेश्वर नाईक, कवी इंद्रजित भालेराव, पंजाब डख, कांतराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव टाकसाळे यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस, प्रास्ताविक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी तर उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आदर्श शाळा पुरस्कार मिळालेल्या शाळा
आदर्श शाळा पुरस्कार प्रत्येक तालुक्यातून एका शाळेला प्रदान करण्यात आला़ यामध्ये जि़प़प्रा़शाग़व्हा ता़परभणी, जि़पक़े़प्रा़शा़इटोली ता़जिंतूर, जि़पक़े़प्रा़शा़डासाळा ता़ सेलू, जि़प़प्रा़शा़लोणी ता़पाथरी, जि़प़प्रा़शा़ सारंगापूर ता़मानवत, जि़पक़े़प्राक़न्या शाळा सोनपेठ ता.सोनपेठ, जि़प़प्रा़शा़ गोदावरी तांडा ताग़ंगाखेड, जि़पक़े़प्रा़शा़शेख राजूर ता.पालम, जि़प़ प्रा़शा़ कात्नेश्वर ता.पूर्णा या आदर्श शाळांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या