16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeपरभणीविटा येथे सिंगल फेज योजना कार्यान्वित करा

विटा येथे सिंगल फेज योजना कार्यान्वित करा

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : पाथरी तालुक्यातील विटा बुÞ येथील नागरीकांना विज भारनियमनाचा सामना करावा लागत आहेÞ त्यामुळे या ठिकाणी सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी माजी उपसरपंच महादेव हारकाळ यांनी निवेदनाद्वारे माजी आ. मोहन फड यांच्याकडे केली आहेÞ या प्रश्नावर माजी आ. फड यांनी अधीक्षक अभियंता यांची भेट घेवून विजेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना केल्या आहेत.

पाथरी तालुक्यातील विटा (बु.) येथे ३३ के.व्ही.उपकेंद्र असूनही गावात गावठाण फिडर उपलब्ध नसल्याने २४ तास भारनियमनाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. ग्रामस्थांना यामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत असून तात्काळ गावठाणात फिडर उपलब्ध करून देण्याची मागणी हारकाळ यांनी निवेदनाद्वारे पाथरी विधानसभेचे माजी आमदार मोहन फड यांना निवेदनाद्वारे केली होतीÞ.

माजी आ. फड यांनी हारकाळ यांच्या मागणीची तात्काळ दखत घेत नुकतीच जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन विटा येथील विजेचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्याÞ तसेच निष्क्रिय असणा-या कर्मचा-यांची तक्रार करून या ठिकाणी सक्रिय कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विटा येथील विजेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहेÞ महादेव हारकाळ यांनी गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या