22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeपरभणीकळमसरा प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या

कळमसरा प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या

एकमत ऑनलाईन

मानवत : जळगाव जिल्हातील पाचोरा तालूक्यातील कळंबसरा या गावात घडलेल्या घटनेचा निषेधार्थ मानवत येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतीने मंगळवार, दि.२५ मे रोजी मानवतचे तहसीलदार यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनातून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हातील पाचोरा तालूक्यातील कळंबसरा या गावात घडलेल्या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बबनराव घोलप (नाना) यांच्या आदेशानुसार व परभणी ग्रामिण जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मानवत येथे कळमसरा येथील त्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना मानवत तहसील प्रशासनाच्या मार्फत विविध मागण्याचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महा संघाच्या वतीने देण्यात आले. या निवेदनात कळमसरा येथील १३ वर्षीय चर्मकार समाजातील अल्पवयीन युवतीवर सात ते आठ नराधमांनी त्या मुलीला उचलून घेऊन तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे.

या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा तसेच गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी व पीडितास व कुटूंबास योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, मानवत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, शहर प्रमुख हनुमान नांदुरे, वैभव पानझाडे, पप्पू पानझाडे, संतोष कांबळे, रमेश केंदळे, विलास पतंगे, ओमकार वाघमारे यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व चर्मकार समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या