24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीगीत गातांनाच हृदयविकाराने महिलेची एक्झीट

गीत गातांनाच हृदयविकाराने महिलेची एक्झीट

एकमत ऑनलाईन

परभणी : होमगार्डची नोकरी सांभाळत गायनाची छंद जोपासणा-या संगिता गव्हाणे या बॅड पथकात गाणे गात असतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने क्षणाधार्थ त्यांनी या दुनियेतून एक्झीट घेतल्याची घटना परभणी शहरात घडल्याचा लाईव्ह व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे

परभणी जिल्हा होमगार्डमध्ये संगीता गव्हाणे (४८) या नौकरीस आहेत. त्या शनिवार बाजार परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांचे पती पोलिस दलामध्ये जमादार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहेÞ संगीता गव्हाणे या नौकरी बरोबर आपली आवड म्हणून गायनाचा छंद ही त्या जोपाण्याचे काम करीत शनिवारी पाथरी रस्त्यारील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभ होता. शेवतींच्या मिरवणुकीत संगीता गव्हाणे या बँड पथकात सुरेल आवाजात गात होत्या, गाणे संपण्यापुर्वीच त्यांना हृदयविकाराचा झ्टका आलाÞ त्याच वेळी त्या जमिनीवर कोसळल्या. तात्काळ उपस्थितांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
————————

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या