23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeपरभणीशेतक-याची विषारी औषध पिऊन आत्महत्या

शेतक-याची विषारी औषध पिऊन आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : तालुक्यातील शेळगाव येथील तरूण शेतकरी विलास विष्णू जाधव वय ४० यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांना शेळगाव गट नं. ४२४ मध्ये सामाईक ३ एकर २० गुंठे शेती होती.

तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक शेळगावचे १ लाख रूपयांचे कर्ज होते़ सततची नापिकी व कर्जबाजारीपणा, पिक विमा न मिळाल्याने विलास जाधव यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परीवार आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या