22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeपरभणीशेतक-याची गळफास लावून आत्महत्या

शेतक-याची गळफास लावून आत्महत्या

एकमत ऑनलाईन

कौसडी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी मनोज गणेशराव देशमुख वय ४० वर्षे या शेतक-याने कर्जाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. २० जुलै रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली.

कौसडी येथील मनोज देशमुख यांना पाच एकर शेती असून त्यांच्याकडे बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ७० हजार रुपये तर तुळजाभवानी अर्बन बँकेचे २ लाख रुपये कर्ज होते. सततची नापिकी, कर्ज कसे फेडावे या चिंतेत मनोज देशमुख यांनी स्वत:च्या शेतात सकाळी ९ वाजता झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मयताचे वडील गणेशराव देशमुख यांनी बोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत मुळे, बीट जमादार शेख रफिक, पोकाँ. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या