मानवत : तालुक्यातील मंगरूळ बू येथील तीन रोहित्रास पुरवठा करणारी विद्यूत वाहक करणारी तार गेल्या चार दिवसांपासून तुटली असून या संबंधी मूख्य लाईनमन मुलगीर यांच्याशी शेतक-यांनी संपर्क साधून माहीती दिली असता लाईनमन मूलगीर यांनी गावातील झिरो वायरमेन यांना सांगतो असे म्हणून शेतक-यांची समजूत घालून रवानगी केली़ विज वितरण कंपनीने चार दिवस झाले तरी याकडे दूर्लक्ष केल्यामुळे शेतक-यांची हेळसांड होत आहे. याकडे तात्काळ लक्ष देवून वीज पुर्ववत न झाल्यास या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.
शेतक-यांनी कापूस, सोयाबीन पेरणी केली असून परिसरात अत्यअल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतक-यांनी हजारो रुपयांचे बी, बियाण्यासह खत पेरणीसाठी वारपले आहे़ परंतू सध्दा परिसरातील विजेची तार तूटल्यामूळे सर्वत्र लाईट बंद आहे़ मंगरूळ बू मध्ये झिरोवायरमेन जवळपास १० ते १२ असल्याचे बोलल्या जात आहेत. विज वितरणचे वरीष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देऊन झिरोवायरमनवर अकूंश ठेवावा व अशा लाईनमनकडून जो कर्मचारी काम करून शेतक-यांची लूट करत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास या विरोधात आंदोलन करावे लागेल अशी चर्चा गावातील शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.