22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीबँकेबाहेर शेतकरी बसले ताटकळत

बँकेबाहेर शेतकरी बसले ताटकळत

एकमत ऑनलाईन

मानवत: तालूक्यातील नागरीकासह शेतकरी व विविध योजनेतील लाभार्थी शहरातील बॅकेत चकरा मारत असून बॅकेच्या बाहेर कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. तसेच नागरिकांना भर उन्हात ताटकळत तासंतास उभे राहण्याची वेळ आली आहे. मानवत तालूक्यातील शेतक-यासाठी पिक कर्ज व विविध योजनेतील निराधार व जेष्ट नागरीकांसाठी विविध योजनेच्या माध्यमातून सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनूदान टाकले तर पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात अनूदान टाकण्यात आले तर शेतक-यांना पीक कर्ज वाटप करा अशी मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली.

त्यामूळे जिल्हाधिकारी यांनी आदेशीत करून शेतक‍-यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी समिती नियूक्त करण्यात आली आहे. समितीने प्रस्ताव बॅक प्रशासनाला दिले आहे. त्यामूळे शेतक‍री अनूदान मिळण्यासाठी अनेक तास बॅके बाहेर रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. बॅकां समोर कोरोना च्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. या सर्व बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांतून व्यक्त केल्या जात आहे.

डेल्टा व्हेरिएंटपासून बचाव अत्यंत आवश्यक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या