31.8 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeपरभणीभरधाव कार विहिरीत पडली; डॉक्टरांचा मृत्यू

भरधाव कार विहिरीत पडली; डॉक्टरांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

परभणी : औरंगाबाद हुन परभणीकडे भरधाव वेगाने येणार्‍या एका कारचे टायर फुटल्याने कार विहिरीत पडून झालेल्या अपघातात एका डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना पाथरी ते परभणी रोडवर पेडगाव शिवारात शनिवारी दुपारी अकराच्या सुमारास घडली.

https://www.youtube.com/watch?v=y0qtoccIY4E

मानवत रोड हुन परभणी कडे होंडा कंपनीची कार गाडी क्रमांक MH 01 BG 4886 भरधाव वेगाने परभणीकडे येत होती या वेळी पेडगाव शिवारात या कारचा टायर फुटला यामुळे चालक डॉक्टर सय्यद मुजम्मिल यांचा गाडीवरील ताबा सुटला यामुळे ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्यया विहिरीत पडली. ही विहीर पाण्याने भरली होती यामुळे चालक मुजम्मिल यांना बाहेर पडता आले नाही.

ही गाडी काढण्यासाठी नागरिकांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रयत्न करत असताना गाडी बाहेर निघत नव्हती म्हणून क्रेन च्या साहाय्याने गाडी बाहेर काढली असून गाडी चालवत असलेले डॉक्टर सय्यद मुजमिल यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांचे मेहुणे घटनास्थळी आले असता ओळख पटली. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. या वेळी रस्त्यावर बघ्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर काही काळ वाहतूक खोळंबली.

विद्यार्थ्यांसाठी शाळेचा रस्ता खडतरच, अनेक शिक्षकांना कोरोनाने घेरले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या