पूर्णा : शहरात गेल्या काही दिवसां पासून कोरोनाचे रुग्ण वाढ होत असल्याने पूर्णेकराची चितेत वाढली असता ब-याच भागात डासाचा प्रमाण वाढल्याने व यंदा नपा प्रशासनाने या वेळेस फॉकिंग मशीनद्वारे कशाल्या प्रकारची फवारणी करण्यात आली नसल्याने कोरोना पाटो पाट आता मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगाचा धोका नागरिकाना होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे मुळे शहरातील प्रत्येक गळी बोलीत सनटाइजेस सह फॉकिंग मशीन द्वारे फवारणी करण्याची मागणी होत आहे.
शहरात एक दिवस आड कोरोना पाझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने आदीच पूर्णेकर दहशती खाली वावरत असताना शहरात पावसाच्या पडलेल्या पाणी मुळे जागोजागी दूषित पाण्याचे डबके निर्माण झाले आहे त्याच बरोबर कचरा उचल्यानेच्या घटा गाडीही काही भागात येत नसल्याने नागरिकांना आपल्या घरातील कचरा रस्त्यावर टाकावे लागत आहे त्यामुळे स्वच्छताचा पूर्णा शहरात बोजवारा वाजला आहे.त्यामुळे प्रत्येक ठिकाणी डासाचा प्रदुभावं वाढला आहे सद्या खाजगी दवाखान्यात रुग्णाची गर्दी वाढली आहे ब-याच नागरिकांना अंग दु:खी,हिवताप सारखे लक्षण दिसू लागल्याने शहरात न पा च्या हलगर्जीपणा मुळे मलेरिया डेंग्यू सारख्या रोगाची भिती वाढली आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी गवळी गल्लीतील एका तरुणाचा डेंग्यू मुळे मूर्त्यु झाला होता तरी पण न पा प्रशासनाने जाग आली नव्हती स्वच्छताच्या नावा वर लाखो रुपयांची बिले दर महिन्याला काढण्यात येऊन ही शहरात स्वच्छतेचा तीन तेरा वाजला आहे.इतकेच नव्हे कोरोनाचे रुग्ण वाढ होत असल्याने काही ठिकाणी न पा प्रशासना तर्फे सनटाईजेस फक्त पाणीच वापरून करण्यात आली हा मुद्दा नुकतेच सुमन मंगल कार्यालयात झालेल्या बकरिद ईद निमित्त घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उपस्थितीत गंगाखेडचे उप.वि.अधिकारी सुधीर पाटिल,तहसीलदार वंदना मस्के याच्या समोर उपस्थित झाला होता तरी पण या बाबत न पा प्रशासनास जाग आली त्यामुळे नागरिकां मध्ये न पा प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
सद्या नागरिका मध्ये हिवताप, अंगदर्द,ची साथ दिसू लागल्याने कोरोना पाठोपाठ डेंग्यू,मलेरियाची ही साथ पसरण्याची भीती निर्माण झालीअसून त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात त्वरित न पा प्रशासनाने सनटाईजेस सह फॉकिंग मशीन द्वारे फवारणी करण्याची मागणी होऊन याकडे जिल्हाधीकरी दिपक मुगळीकर यांनी लक्ष घालून स्वच्छताच्या नावा वर निघणा-या प्रत्येक महिन्याला लाखों रुपयांचा बिलाची ही चौकशी करावी अशी मागणी ही पुढे येत आहे.
Read More कोरोना विषयी आरोग्य विभागाची बेफिकीरी