कौसडी : जिंतूर तालुक्यातील कौसडी जि.प.प्रशाला येथे दि.०६ मे रोजी बदली झालेल्या जि.प.कें.प्रा.शा., जि.प.प्रा.शा.उर्दू, जि.प.प्रा.शा. तसेच जि.प.प्रशाला येथील १० शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती कौसडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी जि.प.कें.प्रा.शा. कौसडी येथील भगवान राऊत, खिस्ते मुंजाभाऊ, हारकळ दिपक, स्वाती गुंजकर, जि.प.प्रा.शा.उर्दू कौसडी येथील गौस, हालिमा, जि.प.प्रा.शाळा कौसडी येथील राम दहिफळे, वैशाली सरनाईक तसेच जि.प.प्रशाला येथील लांडगे, देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव खरात यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनी केलेल्या कार्याबद्दल पुढील कार्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक अलीम, परविन, सौ.गाजरे, शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी जिवने, बाबासाहेब बहिरट, बाबासाहेब बारवकर, भगवान खैरे, गोविंदराव घुगे, मुक्ता जिवने, मा.अध्यक्ष आणि आलीम्मद दीन गाजरे ताई शालेय शिक्षण समिती सदस्य शिवाजी जिवाने बाबासाहेब बहिरट, बाबासाहेब बारवकर, भगवान खैरे, गोविंदराव घुगे, सौ.मुक्ता जिवने, मा.अध्यक्ष रमेश बारवकर उपस्थिती होते.