परभणी : मुरुंबा- देवठाणा या पुलाचे काम येत्या सात महिण्यात पूर्ण होऊन दळण वळणासाठी हा पुल खुला होईलÞ त्यामुळे १५ गावे थेट परभणीला कमी अंतरात जोडली जाणार आहेत अशी माहीती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या देवठाणा- मुरुंबा या पुलाची पाहणी आ.Þ डॉ. पाटील यांनी केलीÞ यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, मागील ४० वर्षापासून या पुलाची मागणी होत होती. या पुलामुळे परभणी विधानसभेतील देवठाणा, ंिपपळगाव, सावंगी, टाकळी बोबडे, जोड परळी, पिंगळी कोथळा, साडेगाव आदी गावे थेट व कमी अंतरात परभणी शहराशी जोडली जाणार आहेत. या नदीवर पुल नसल्याने परीसरातील शेतक-यांना आपला ऊस साखर कारखान्याकडे घेवून जाताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होताÞ पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ऊस वाहतुकीचा प्रश्न निकाली निघून या भागातील ऊस उत्पादकता आणखी वाढण्यास मदत होणार आहेÞ या पुलाच्या कामाची पाहणी करताना शेतक-यांसह ग्रामिण भागातील नागरीकांच्या चेह-यांवर मोठे समाधान दिसून आलेÞ.
या पूलाचे काम नाबार्ड मधून नियोजित केले असून ०७ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असल्याचे आमदार डॉ.पाटील म्हणाले. या पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी असली तरी अप्रोच रोडमुळे दोन्ही बाजूला असणा-या रस्त्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. परंतू आमदार डॉ.पाटील यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून तब्बल २५ लाख रुपये देऊन २ एकर जमिन विकत घेवून ही जमिन शासनाच्या नावे केल्यानंतर या पुलाला मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे.
या पुलाच्या कामाबद्दल मुरूंबा, देवठाणा ग्रामस्थांच्यावतीने आमदार डॉ.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुरूंबा येथील संत गजानन महाराज मंदिर सभागृहाचे भुमीपुजन आमदार डॉ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुरूंबा येथील जिल्हा परिषद शाळेस आमदार डॉ.पाटील यांनी भेट देऊन शाळेतील सुवीधांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश बोबडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संदीप झाडे, पंचायत समितीचे माजी सदस्य गोपीनाथराव झाडे, सरपंच रमेशराव खंिटग, संभानाथ काळे, धीरज पोते, श्याम पोते, रमेशराव चोपडे, तुकाराम चोपडे, दादाराव चोपडे, पोलीस पाटील देवठाणा पंढरीनाथ खंिटग, दिनेश झाडे, बबनराव झाडे, देवठाणा चेअरमन कृष्णा खंिटग, माऊली पोते कुंभकर्ण खंिटग गोंिवद झाडे रामेश्वर चोपडे, पंढरीनाथ झाडे, नारायणराव झाडे तुकाराम खंिटग व मान्यवर उपस्थित होतेÞ