पूर्णा/प्रतिनिधी
ताडकळस येथुन जवळच असलेल्या गोळेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात एका १५ वर्षीय मुलाचा पोहताना पाण्यातील जाळ्यात पाय अडकल्याचे पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दिÞ१९ मे रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोळेगाव येथील विष्णू पंढरीनाथ दुधाटे वय १५ वर्षे हा तरुण शेळी मेंढी सांळाळण्याचे काम करीत होता.
नेहमीप्रमाणे दि.१९ मे रोजी विष्णु शेळ्या व मेंढ्या घेऊन गोदावरीच्या नदी काठी गेला आणि शेळ्या गोदावरी नदीच्या काठावर चरण्यास सोडून दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रात पोहत होता. परंतु पाण्यातील जाळ्याला पाय अडकल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गोदावरी नदीच्या काठावर एका दुस-या शेळकरी माणसाने गावात सांगीतली. गावात ही माहिती मिळताच अनेकांनी धाव घेऊन विष्णू यास बाहेर काढून तात्काळ परभणी येथे दवाखान्यात घेऊन गेले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेने गोळेगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.