24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीतृतीय पंथीयासह शेतकरी बचाव कृती समितीचे आंदोलन

तृतीय पंथीयासह शेतकरी बचाव कृती समितीचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : मानवत येथे पकडण्यात आलेल्या औषधी प्रकरणी संबंधितावर कृषी कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी तृतीय पंथीयासह शेतकरी बचाव कृती समितीने निवेदन देण्यात आले.

परभणी जिल्हयात अनेक शेतकऱ्याच्या तणनाशक, बियाणे, खते, औषधी खरेदी केल्यानंतर त्याचा उपयोग होत नसल्याच्या तक्रारी होत्या . नामांकित कंपनीचे औषध वापरुनही त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. अशावेळी नामांकीत कंपनीची बनावट औषधी बाजारात विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यावरुन दि. ९ ऑगस्टला बनावट माल पकडला होता. संबधीत कंपनीच्या प्रतिनिधी यांनी गुन्हे दाखल केले असून पोलिस तपासात अनेक व्यापारी यात सहभागी असल्याचे निष्पन्न होत आहेत. यात लाखो रुपयाचा माल पकडण्यात आला आहे . हा माल परभणी जिल्हयात पकडण्यात आल्याने तो विक्रीसाठी आलेला होता हे स्पष्ट होत आहे.

शेतकरी अधीच आर्थीक संकटात असून दररोज आत्महत्या होत आहेत . अशातच बनावट बियाणे , औषधी, खते जर त्याला मिळत असतील तर शेतकरी उध्वस्त करण्यास मोठी टोळी देशभर कार्यरत असण्याची शक्यता आहे. पोलिस तपासात उघड झालेल्या व्यापाऱ्यावर कृषी कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात यावे, बनावट औषधी निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शेतकरी बचाव कृती समितीचे सुनिल बावळे, मारोती साढ़े, गणेश देशमुख, उध्दव शिंदे, अर्जुन पंडीत, त्रिंबक शेळके, रमेश लोखंडे, रामप्रसाद बोराडे, शिवाजी सोनवणे, दिपक गुळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या