24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeपरभणीडॉक्टरांसह परिचारीकेविरूध्द गुन्हा दाखल

डॉक्टरांसह परिचारीकेविरूध्द गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती करीता दाखल केलेल्या एका महिलेच्या उपचारात दुर्लक्षितपणा केल्याबद्दल व मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टरांसह परिचारिकांविरुध्द येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस पुढील तपास करीत आहेत. सेलू येथील आंबेडकर नगरातील रहिवाशी काजल नितीन धापसे (वय १९) या विवाहितेस दोन वर्षांपूर्वी म्हणजे २४ एप्रिल २०१९ रोजी प्रसुतीकरीता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसरे दिवशी २५ एप्रिल रोजी या महिलेवर शस्त्रक्रिया करुन प्रसुती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्या पाठोपाठ संबंधित महिलेची प्रसुती होवून तीने बाळास जन्म दिला. परंतु, त्याच दिवशी रात्री काजल धापसे यांची प्रकृती बिघडली. यावेळी रात्र पाळीसाठी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना माहिती देण्यात आली होती. परंतू रात्रपाळीसाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिका-यांसह परिचारिकांनी या विवाहितेकडे पाहिले सुध्दा नाही. ज्यावेळी या महिलेला तपासण्यात आले त्यावेळी प्रसुती झालेली संबंधीत विवाहिता मृत्यू पावली होती. हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर नातेवाईकांनी उपस्थित डॉक्टरांना जाब विचारला होता. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेवून संबंधित प्रकरणाच्या चौकशी करीता तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली होती. डॉ.नरेंद्र वर्मा, डॉ.किशोर सुरवसे, डॉ.संदीप काला यांच्या समितीने केलेल्या चौकशीतून प्रसुती कक्षात हजर असणा-या डॉक्टरांसह इतर कर्मचा-यांनी योग्यरीत्या काम केले नाही. तसेच कामात हयगय केली होती. निष्काळजीपणा केला असल्याचा अहवाल दिला होता. चौकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारेच काजल धापसे यांच्या मातोश्री कविता माणिकराव झोडपे यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. झोडपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ.शेळके, अधिपरिचारिका अनुजा नरवाडे, डॉ.दुरेशेवार, गुलाम जिलानी (समरीन), डॉ.अरुणा राठोड यांच्याविरुध्द शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.

सहकाराचे ‘अमिता’स्त्र कुणासाठी ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या