24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीतलवार घेवून अंगावर धावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

तलवार घेवून अंगावर धावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील अपना कॉर्नर येथील अपना बाजारचे मालक मोहम्मद इलीयास नुर मोहम्मद यांच्यावर क्षुल्लक कारणाने दि २१ रोजी दु.१२ च्या सुमारास तलवार घेवून अंगावर धावून आल्याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील मध्यवस्तीत असलेले अपना कॉर्नर या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते याच परिसरात असलेले फर्निचरचे दुकान अपना बाजार या दुकानात बसून एका जमीनीचा वाद सोडविण्यासाठी आलेल्या एका नागरिकांने चक्क तलवार काढून वार करण्याचा प्रयत्न केला. शॉपचे मालक मोहम्मद इलियास हे नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असतात एकबाल नगर येथील अब्दुल आसेफ, मोहम्मद रमीज यांच्या जमीनीचा वाद मिटविण्यासाठी बैठक चालू होती. यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद सलीम कच्छी, मोहम्मद रफीक आदी उपस्थित होते. सदरील जमीनीचे टॅक्स पुर्ण भरून जमीन नावावर करून देण्यासाठी वाद निर्माण झाला.

जोरजोरात शिवीगाळ करत अबदुल आसेफ पि.अ.रशीद अंगावर धावून आला. इतरांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करून धमक्या देत होते.नंतर स्कुटीच्या डिक्कीतून अंदाजे दोन फुट लांब असलेली तलवार काढून हातात घेवून फिर्यादीच्या अंगावर जोर जोरात धावून आला.त्यावेळी मोहम्मद सलीम यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणातील मोहम्मद रमीज पि.मो.रफीक रा.एकबाल नगर परभणी हे फक्त ओळखीचे असल्यामुळे त्यांना दुकानात बसवून जमीनीचा वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरु होता.हा वाद विकोपाला जात त्यांचे पर्यावसण भांडणात झाल्याची तक्रार मोहम्मद इलीयास यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली.

सीबीआयच्या राजकीय वापरामुळेच राज्‍य सरकारची परवानगी बंधनकारक केली !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या