23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeपरभणीअखेर १६ व्या दिवशी महापालिका कर्मचा-यांचा संप मिटला

अखेर १६ व्या दिवशी महापालिका कर्मचा-यांचा संप मिटला

एकमत ऑनलाईन

परभणी : महानगरपालिकेतील कर्मचा­-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी गेल्या १६ दिवसापासुन सुरू केलेला संप शुक्रवार दि. २० रोजी नगरविकास विभागाच्या सचिवांसोबत परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील यांच्यात ऑनलाईन झालेल्या बैठकीत कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परभणी शहर महापालिकेतील कर्मचारी गेल्या १६ दिवसापासून संपावर गेले होते.महापालिका प्रशासन व संघटनांच्या पदाधिका-यांत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने कर्मचारी संतप्त झाले होते. नगरविकास विभागाच्या सचिवांसोबत परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांची ऑनलाईन बैंठक झाली. या बैंठकीत कर्मचा-यांच्या प्रश्नावर चर्चा होवून मनपा अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय होताच कर्मचार-यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महानगरपालिका, सफाई कामगार व कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, उपाध्यक्ष पिराजी हत्तीअंबीरे, सचिव के.के. भारसाखळे, सहसचिव किरण साळवे, कोषाध्यक्ष देविदास धापसे, संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे यांच्यासह महापालिकेच्या कर्मचारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या