30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात लॅबकडून बाधितांची आर्थिक लुट

परभणी जिल्ह्यात लॅबकडून बाधितांची आर्थिक लुट

एकमत ऑनलाईन

जिंतूर : कोरोनाबाधित रुग्णाची रक्त तपासणी करतानाच शहरातील काही लॅब गरज नसताना इतर एचआयव्ही, लिव्हर टेस्ट सारख्या अनावश्यक चाचण्या करून घेत अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले जात असल्याची तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रदीप कोकडवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दिप मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

निवेदनात शहरातील लॅबकडून कोरोना रुग्णांचा आर्थिक छळ सुरू असल्याचे म्हटले आहे. ज्याची आवश्यकताच नाही अशाही तपासण्या लॅबकडून होऊ लागल्याची बाब निदर्शनास आणून दिली. शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णास रक्त तपासणी करून घेण्याबाबत सुचवले. त्यावळी त्या बाधिताने शहरातील एक लॅबकडे रक्त नमूना दिला. त्या लॅबने सीबीसी, सीआरपी, डी.डीमर, फेरीटीन, एलडीएच या रक्त तपासण्या करून देणे आवश्यक असताना कोविड प्रोफाईल या नावाने एचआयव्ही, लिव्हर टेस्ट सह आवश्यकता नसलेल्या टेस्ट करून घेत चार हजार 100 रुपयांचे शुल्क घेतले, असल्याचे नमूद केले.

संबंधित बाधित रुग्णाने दोन तपासण्या केल्या. त्याचे शुल्क फोन पेने अदा केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान,कोविडसाठी शासनाने फक्त 600 रुपये घ्यावेत, असे दर निश्चित करून दिलेले असतानाही लॅब जादा दर घेऊन अनावश्यक तापसण्या करून कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करू लागले असुन संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

 

इव्हेंटबाजी कमी करा – राहुल गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या