22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीझरीतील आठवडी बाजारातून एकाच दिवशी पाच मोबाईलची चोरी

झरीतील आठवडी बाजारातून एकाच दिवशी पाच मोबाईलची चोरी

एकमत ऑनलाईन

झरी : येथे रविवारी आठवडी बाजार भरतोÞ येथील आठवडी बाजारातून ०४ सप्टेंबर रोजी पाच मोबाईल चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाइलवर डल्ला मारीत असल्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाईल चोरीला गेलेल्यांमध्ये शेतकरी व खेड्यापाड्याचे नागरिक आहेतÞ मात्र पाच जणांपैकी जलालपूर येथील दिनकर टेकाळे यांनी फक्त पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजारासाठी येणा-या ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहेÞ बाजाराच्या दिवशी पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या