24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीमुसळधार पावसाने पाच गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसाने पाच गावांचा संपर्क तुटला

एकमत ऑनलाईन

मानवत : तालुक्यातील वझुर येथे आज दुपारी ०२़३० वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली़ जवळपास ०२ तास झालेल्या या पावसामुळे या ठिकाणच्या ओढ्याला मोठा पूर आला होता़ या पुरामुळे वझुर बु़, वझुर खु़, थार, वांगी, कुंभारी या पाच गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ तसेच विद्यार्थ्यांसह नागरीकांना ओढ्याचे पाणी ओसरेपर्यंत अडकून पडावे लागले.

मानवत तालुक्यातील वझुर येथे छोटा ओढा आहे़ थोडा पाऊस झाला तरी या ओढ्याला पूर येवून पाच गावातील नागरीकांचा अन्य गावांशी संपर्क तुटतो़ वझुर येथे शनिवार, दि़१० सप्टेंबर रोजी दुपारी ०२़३० वाजताच्या सुमारस मुसळधार पावसास सुरूवात झाली़ जपळपास ०२ तास कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे या ठिकाणचा ओढ्याला मोठा पूर आला़ त्यामुळे वझुर बु़, वझुर खु़, थार, वांगी, कुंभारी या ०५ गावाचा संपर्क तुटला.

या ओढ्याला ऐरवी देखील पूर आला की वरील ०५ गावांचा अन्य गावांशी कमीत कमी ०२ तास संपर्क तुटतो़ आज झालेला पाऊस मुसळधार असल्याने ओढ्याच्या पुरामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ तसेच ओढ्या जवळील व परीसरातील शेतात पाणीच पाणी झाले होते़ त्यामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे़ या पावसाने सोयाबीन व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा बेहाल झाल्याचे दिसून येत आहे़ वझुर ब़, वझुर ख़, थार, वांगी, कुंभारी या गावातून अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेज, क्लासेसला गेले होते़ त्यांना ओढ्याल पूर आल्यामुळे जवळपास दोन तास विद्यार्थ्यांसह नागरीकांना पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली़ त्यामुळे परीसरातील नागरीकांतून या ओढ्यावर पूल उभारण्याची मागणी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या