27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीपोलिस कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हद्दपार माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात

पोलिस कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हद्दपार माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर पोलिस स्टेशन हद्दीतून काही महिन्यापासून हद्दपार असलेले गुंड प्रवृत्तीचे माजी नगरसेवक शेख इस्माईल हा हद्दपारीचा कालावधी सुरू असताना बेकायदीशीर रित्या शहरात वास्तव्य करीत असल्याने स्थानिक पोलिसांनी शनिवार दि. ४ जून रोजी रात्री ११ वाजता कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्यास राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील गुंड प्रवृत्तीचे माजी नगरसेवक शेख इस्माईल शेख सलीम व इतर तीन आरोपींना जिल्हा पोलिस दलाच्या वतीने अनेक गुन्हेगारी घटनेमुळे ९ महिन्याकरिता हद्दपारीचे आदेश पारित केले होते. मात्र हद्दपारीचे कालावधी सुरू असतानाच शेख इस्माईल हा जिंतूरात बेकायदेशीर रित्या वास्तव्य करीत असल्याने ४ जून रात्री ११ च्या सुमारास गुप्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस प्रशासनाच्या मोठ्या पथकाने धडक कारवाई करत हद्दपार असलेला आरोपी शेख इस्माईल यांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम १४२ बिपीआय एक्ट नुसार गुन्हा नोंद करुन त्या आरोपीस पोलिसांमार्फत पुन्हा परभणी जिल्ह्या बाहेर औरंगाबाद एमआयडीसी पोलिस हद्दीत सोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

सदरील कारवाईउपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे, पो.नि. दीपक दंतुलवाड, सपोनि विलास कोकाटे, पीएसआय कोरके, पो कॉ. वाघमारे,पॉ.कॉ. भुसारे,पो.कॉ. शहाणे,पो.कॉ. निळेकर पो.कॉ. वाकडे महिला पो. कॉ.श्रीमती लीला जोगदंड आदींच्या पथकाने केली आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या