21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeपरभणीमाजी खासदार व माजी जिल्हा प्रमुख शिंदे गटाच्या मार्गावर

माजी खासदार व माजी जिल्हा प्रमुख शिंदे गटाच्या मार्गावर

एकमत ऑनलाईन

परभणी : शिवसेनेचे एक माजी खासदार व एक माजी जिल्हाप्रमुख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात येत्या एक ते दोन दिवसात दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली.

शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्यानंतर त्याचे फारशे पडसाद परभणी जिल्ह्यात अद्यापपर्यंत उमटले नव्हते. काही दोन-चार कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचा मार्ग स्विकारला होता. मात्र बहुतांश शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी होते़ मात्र अलिकडील काही दिवसात राज्या प्रमाणेच काही जुने शिवसैनिक शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

यातुनच शिवसेनेत दोन वेळा खासदार राहिलेले व सध्या महाविकास आघाडीत प्रदेश पातळीवरच्या पदावर कार्यरत असलेले नेते आणि गेल्या काही वर्षात शिवसेनेपासुन दुर असलेले मात्र इतर कोणत्याही पक्षात दाखल न झालेले माजी जिल्हा प्रमुख हे दोघे आपल्या समर्थकासह मुंबईत दाखल झाले असून आज वा उद्या त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होणार आहे. त्यातुन ते शिंदे गटात जाणार असल्याची खात्रीलाक माहिती हाती आली आहे़ त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोरीपासुन दुर राहिलेल्या या जिह्यालाही आता हळूहुळू बंडखोरीची लागत लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या