27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीजिंतूर पोलिस चौकीसमोरील चार दुकाने फोडली

जिंतूर पोलिस चौकीसमोरील चार दुकाने फोडली

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरातील पोलीस चौकी समोरील चार दुकाने अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना रविवार, दि़ ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. चोरीच्या घटनेत चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे़ भर चौकात एकाच रात्री तब्बल चार दुकाने फोडल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नेहमी वाहनांसह नागरिकांची प्रचंड रेलचेल असते़ त्यामुळे परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलीस दलाकडून येथे चौकी उभारण्यात आली आहे. मात्र रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चक्क पोलीस चौकी समोरील सोनी मेडिकल, यमुना मशनरी, पुरोहित स्वीट मार्ट, भोलेनाथ इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक या चार दुकानांची कुलुपे तोडून किरकोळ चोरी करून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

दरम्यान चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी सपोनि़चौरे, पोहेका़शिंदे, पोलीस हवालदार जिया खान, पोकॉ धोत्रे, जमादार लीला जोगदंड आदींना सोबत घेऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी परभणी येथून सपोनि पठाण, पो.ह.कॉ.निळूबा मुंढे, पो.हे.कॉ.बि.आर.शिंदे यांचे फिंगर पथकाने फिगर चाचणी नमुने घेतले़ पो.कॉ.बुधवडे, पोलीस चालक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.

श्वानाने चारही दुकानातून बस स्थानक, जि.प. शाळेच्या मैदानावर घुटमळल्याने चोरट्याचा सुगावा लागला नाही. मात्र घटनेची माहिती मिळताच बघ्याची एकच गर्दी झाली. ऐन सनसुदीच्या काळात चक्क पोलीस चौकीसमोरील दुकाने फोडणा-या चोरट्यास गजाआड करण्याकरिता पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. एकाच वेळी चार दुकाने फुटल्याने व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या