29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeपरभणीमहावितरणकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

महावितरणकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

एकमत ऑनलाईन

ताडकळस : जिल्हाधिकारी यांनी कोरोना्च्या काळात विज कनेक्शन कट न करण्याचे दिलेल्या आदेशाला विज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी केराची टोपली दाखविली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये अशी मागणी होत आहे. कोरोना बाधित अतिगंभीर रूग्णांना प्राणवायुची आवश्यकता आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी टंचाईस देखील सामोरे जावे लागु शकत.े जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गावोगावी मुख्य रस्त्यावरील खांबावरील पथदिवे सुरळीतपणे चालू असने आवश्यक असल्याचे त्या परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. तरी देखील महावितरण कंपनीकडून ताडकळस व परिसरातील गावांचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी दहा ते पंधरा दिवस खंडीत केला जातो आहे.

ताडकळस येथील ३३ के.व्ही. केंद्राद्वारे दोन फिडर मधुन परिसरातील चौदा गावे, दोन एक्सप्रेस फिडर शेतीसाठी व एक गावठाणसाठी असा मिळुन दोन फिडर मधुन विद्युत पुरवठा दिला जातो. ताडकळस, फुळकळस, माखनी, माहेर, शिरकळस, तामकळस, महातपुरी, पुनकळस, खांबेगाव, एखुरखा, बलसा, रामपूर, इस्लामपूर आदी गावांना एक दिवस अंतराने विद्युत पुरवठा देण्याचा प्रकार सुरू असतांना मार्च महिन्याच्या बिलभरणा हिशोबापोटी टप्प्याटप्प्याने सर्वच गावांचा पंधरा ते वीस दिवस विद्युत पुरवठा खंडित केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतक-यांना शेतीसाठी देण्यात येणारा विद्युत पुरवठा करण्यास जी वेळ दिलेली आहे. त्यावेळेत देखील विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वारंवार खंडीत केला जातो आणि उरलेल्या वेळात पण पाण्याचे पंप कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे फिरत नाहीत.

रोहित्रामध्ये कमी दाबाचा विद्युतपुरवठा सोडल्या मुळे अनेक रोहित्रामध्ये नादुरुस्त व जळण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित विजबिल भरण्यासाठी ग्राहकांना व शेतक-यांना वेळच्या वेळी बिलच मिळत नसल्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना वीजबीलाच्या वसुलीसाठी भटकंती करावी लागत आहे. पूर्णा तालुक्यातील बिल वाटपाची प्रक्रिया एकता एजन्सी यांच्याकडे असताना देखील विज बिले वेळच्या वेळी वाटप न झाल्याने ति विज बिले ३३ के.व्ही.च्या वापरात नसलेल्या शौचालयात धुळखात पडुन असल्याचे निर्दशनास आले. परिणामी वीजबील ग्राहकांना मिळाले नसल्यामुळे वीजबील किती आले हे समजने देखील दुरापास्त झाले आहे. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीकडून यापुढे तरी ग्राहकांना देण्यात येणारे विज देयके ग्राहकांपर्यंत वाटप करण्यात यावेत व ग्राहकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे. तरी संबंधित अधिका-याने वाळत असलेल्या पिकांना जीवनदान मिळण्यासाठी व आजारी रुग्णांचे औषधी, दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमान व उकड्याचे दिवस, दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांनमधुन होत आहे.

ताडकळस येथे सततचे होत असलेले भारनियमन त्यासाठी रोहित्रा ऐवजी फिडरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. एक्सप्रेस फिडरसाठी खडाळा स्टोन क्रेशर येथे दोनशेचे आठ व ईतर चार असे मिळुन एकूण बारा रोहित्र आहेत.डेरी, केटी.आय.एल कंपनी येथे पाचशेचे दोन, जेआरकॉटन दोनशेचा एक, ३३ के.व्ही. तीन च्या रोहित्र वरून एक्सप्रेस फिठर नावाखाली विद्युत पुवठा केला जातो.
-व्हि. संतोष गुंजेटी,
कार्यकारी अभियंता ३३ केव्ही उपकेंद्रे

सर्व शेती व घरगुती बिले ही तालुक्यातील सर्व गावासाठी एजन्सी कडून पाठवण्यात येतात व त्याचबरोबर अनेक फोनद्वारे देखील सबंधित देयकाचा संदेश पाठवला जातो. त्या नंतर संबंधित लाईन मन व तांत्रिक काम करणारे यांच्याकडून परस्पर बिलाची रक्कम घेऊन त्यांना पोच पावती पूर्णा येथून दिली जाते.
ए.एस.पठाण, बिल वितरण विभाग

दगड फोडण्यासाठी, सुत पिळण्यासाठी, आईसक्रीम बनवण्यासाठी चोवीस तास पुरवठा सुरू असतो. पावसाळ्यातील चार महिने शेती पंप बंद असतो. आणि भारनियमन धरले तर जेमतेम साठच दिवस वीज पुरवठा भेटतो. पण वर्षाचे बिल मात्र दाम दुपटीने दिले जाते.
केरबा सरकाळे, शेतकरी

महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने वाळू तस्कराचा धंदा तेजीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या